नेकनूर : अनेक वेळा तोंडी सांगून ग्रामपंचायत गावातील रस्त्यांची, नाल्यांची सफाई करत नाही त्यामुळे नेकनुरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.लाखो रुपये खर्च होतो पण गावातील कचऱ्याचे जागोजागी साचलेले ढीग तसेच दिसतात तर नाल्या पावसाळ्यात तुंबलेल्या असतात, स्त्री व कुटीर रुग्णालय परिसरातील नदीपात्र कचराच कचरा, बजार तळावर ही कचऱ्याचे ढीग तसेच मग हा खर्च ग्रामपंचायत नेमका करते कशावर..? नेकनुर गावातील अनेक भागात गेली अनेक वर्षापासून स्वच्छ्ता करण्यात आलेली नाही तर चार गल्ल्या आणि दोन रस्ते म्हणजे गाव नाही त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा,नाल्या यांची सफाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महादेव मुळे शिवसेना तालुका उपप्रमुख यांनी काल ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय नेकनुर यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व गट विकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.यावेळी गणेश चक्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.
