बीड : सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. एक दोन नव्हे तब्बल दहा ते वीस फुटांपर्यंत खड्डे वाळू माफियांकडून नदी पात्रात करण्यात आले आहेत.वाळू उपशामुळे खड्डयात पडून चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच निष्पाप मृत बालकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.राहुल मस्के यांनी केली आहे.जिल्ह्यात वाळू तस्करांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये तसेच खदानीच्या खड्ड्यांमध्ये अडकून आतापर्यंत अनेकांचा मृत्यु झाला आहे. गेवराई तालुक्यात चार बळी गेल्यानंतर आता कुठे प्रशासनाला जाग आली असून जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी सर्व तहसीलदारांना नदीपात्रातील खड्डे शोधन्याचे हा आदेश दिले आहेत.उशिरा सुचलेल्या शहाणपणासोबतच दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचीही आवश्यकता असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी रुपये पाच लक्ष इतकी आर्थिक मदत देण्यात यावी.याबाबत शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ. विनायकराव मेटे यांच्या वतीने विधान परिषदेत आगामी अधिवेशनामध्ये शासनाला जाब विचारणार असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम आक्रमक आंदोलन करुन कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यास सक्षम आहे असा इशाराही अँड.राहुल मस्के यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी मधून पिडीत कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत द्यावी – अँड.राहुल मस्के
RELATED ARTICLES