HomeUncategorizedपस्तीस ते चाळीस टक्के मुस्लीम समाज स्वतःचा नगराध्यक्ष बनवू शकत नाही काय...

पस्तीस ते चाळीस टक्के मुस्लीम समाज स्वतःचा नगराध्यक्ष बनवू शकत नाही काय ? ॲड. शेख शफिक भाऊ

बीड – शहरातील तेलगाव नाका परिसरात प्रभाग क्रमांक १९ मध्ये एआयएमआयएम पक्षाच्या शाखेची स्थापना जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संबोधित करताना शफिक भाऊ म्हणाले की, शहरात वास्तव्यास असलेला पस्तीस ते चाळीस टक्के मुस्लीम समाज स्वतःचा नगराध्यक्ष बनवू शकत नाही काय ? असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना भाऊंनी म्हटले की, क्षीरसागर घराण्याने गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या काळात समाजासमाजाच्या नेतृत्वामध्ये फूट पाडून कलह निर्माण करत बीड नगर परिषदेवर एक हाती अंमल ठेवला. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शहराची अवस्था अत्यंत बकाल झालेली आपण सर्वजण पाहतच आहात. शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा सुद्धा क्षीरसागर घराणे एवढ्या वर्षांपासून सत्तेत असूनही उपलब्ध करून द्यायला तयार नाही. बीड नगर परिषदेला दरवर्षी शासनाकडून दीडशे कोटीचा निधी विकास कामे करण्याकरिता देण्यात येतो. म्हणजे एका पंचवार्षिक मध्ये साडेसातशे कोटी रुपयाचा निधी बीड नगर परिषदेला शासनाकडून येतो. याचा हिशोब जर काढला तर गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी शासनाकडून बीड नगरपरिषदेला मिळालेला आहे. परंतु क्षीरसागरांनी या हजारो कोटी निधीमधून बीड शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी त्यापैकी किती खर्च केला ? आणि किती लपविला ? हे एक गौडबंगाल आहे. विशेष म्हणजे जे क्षीरसागर घराणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के लोकसंख्या मध्ये येतात ते सर्वांना मूर्खात काढून सातत्याने सत्ता उपभोगत आहेत. बाकीच्या समाजाचे लोक आपापसातील हेवेदावे आणि एक दुसऱ्याचे पाय ओढण्यात मग्न आहेत. मग ते कोणत्याही समाजाचे का असेना. याचाच लाभ क्षीरसागर गेले अनेक वर्षे उचलीत असून इतर समाजातील नेतृत्वाला व कार्यकर्त्यांना फक्त त्यांच्या मागेपुढे फिरायला लावत असल्याचे आपणा सर्वांना दिसत आहेच. यामुळे एकूणच शहराची प्रगती होण्याऐवजी दिवसेंदिवस अधोगती होत आहे. क्षीरसागर काका-पुतण्या वाद हा बनावटी आहे. या वादात कुठल्याही प्रकारची सत्यता नाही. बीड शहरात क्षीरसागरांना तगडा विरोधक निर्माण व्हायला नको म्हणून केलेली ही बनवाबनवी ची खेळी आहे. याला जनतेने बळी पडू नये. शहराला विकासाकडे घेऊन जाण्याकरिता नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्याकरिता आता जनतेने एआयएमआयएम पक्षाला साथ द्यावी. एकमेव परखड असलेल्या पक्षाला सत्ताधारी बनवून शहराची अवस्था सुधारण्याकरिता, शहराला विकासाकडे नेण्याकरिता येत्या बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी करावे असे म्हटले.यावेळी शाखा पदाधिकारीशेख समीर शाखा अध्यक्ष, शेख महेबुब भाई, शाखा उपाध्यक्ष, सय्यद शाहरुख भाई सचिव, सय्यद पाशा भाई सह सचिव, सदस्य पठाण जहीर भाई, सय्यद शकील भाई, शेख जाकेर भाई, शेख महेमुद भाई, शेख जलील भाई, शेख मुबीन भाई, शेख सोहेल भाई, सय्यद फेरोज भाई, शेख सद्दाम भाई यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाखा उद्घाटन समारंभासाठी जिल्हा सचिव हाजी अय्युब खान पठाण, खंबीर नेते शेख एजाज खन्ना भैय्या, ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, हाफेज अशपाक, मुफ्ती वाजेद अशरफी, साजन चौधरी, शाकेर भाई, रहेमत पठाण, अन्वर पाशा, हाफेज मुखीद, नविद पटेल, अय्युब भाई, बाबर भाई, खाजा भाई, जाकेर चौधरी, शिवाजी भोसकर, बासेद भाई, सय्यद सैफअली लालू भैय्या आदींची विशेष उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments