HomeUncategorizedआ. विनायक मेटे यांच्या हस्ते मोहम्मदिया कॉलनी येथील मदनी नगर कॉलनीचे नामकरण...

आ. विनायक मेटे यांच्या हस्ते मोहम्मदिया कॉलनी येथील मदनी नगर कॉलनीचे नामकरण समारंभ संपन्न..!!

बीड : शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आमदार विनायकराव मेटे यांच्या हस्ते मोहम्मदिया कॉलनी मिल्लत नगर येथील मदनी नगर कॉलनी चे नामकरण समारंभ संपन्न झाला.यावेळी आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते मदनी नगर पार्टीचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेचे मागील पाच दिवसीय अधिवेशनादरम्यान शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायकराव मेटे यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून लक्षवेधी मांडली होती,मुस्लीम समाजातील अत्यंत गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळावा व या समाजालाही नौकरीत आरक्षण मिळावे या संदर्भात प्रखरतेने भूमिका यावेळी त्यांनी मांडली होती, मुस्लिम समाजाच्या वतीने मदनी नगर येथे आयोजित कार्यक्रमात आ.मेटे यांच्या या भूमिकेच्या समर्थनार्थ भव्य नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित सत्कार समारंभात उत्तर देताना आ. मेटे म्हणाले की,मुस्लिम समाजाचा उपयोग फक्त निवडणुका पुरताच केला जातो व निवडून येऊन सत्ता स्थापन करतात परंतु या अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही पक्षाचा नेता समोर येताना दिसून येत नाही तेव्हा या समाजातील तरुणांनी आपल्या समस्या घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करावे व आपला आरक्षणाचा लढा बुलंद करावा.शिवसंग्राम च्या वतीने या भागातील लोकांच्या इतर नागरी नागरी सुविधा बाबत काही अडचण असल्यास त्या सोडविल्या जातील असे आश्वासनही यावेळी आ.मेटे यांनी दिले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, जेष्ठ अल्पसंख्यांक नेते खालेक पेंटर, शहानवाज खान, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, गणेश धोंडरे, हरिश्चंद्र ठोसर, राहुल गायकवाड, शेख नदीम, प्रकाश जाधव, अजहर भाई निसार भाई, एजाज आतार, बाबू आतार, शाकीर भाई, अजहर खान गय्यास अत्तार, गफार आतार तोफिक आतार, युसुफ आतार, शेख मुजीब, शेख ताहेर, रेहान खान, फैसल खान, शेख सबदर,आजम खान, शेख राजू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments