संग्रामपुर : तालुक्यातील पातुर्डा शिवारातील सितामाता मंदिर परिसरातील एका पडीत शेतातील नाल्यातुन अस्वलास जळगाव जा परिक्षेत्र वनविभाग व बुलडाणा रेस्क्यु पथकाने मोठ्या शिताफीने पकडून पिंजऱ्यात जेरबंद केल्याने शेतकरी मजुरांच्या मनातील दहशत दुर झाली या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे पातुर्डा येथील खेळ माळी शिवारात दि ७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता अस्वलाचे दर्शन शेतात शेतकऱ्यांना झाले त्यामुळे पातुर्डा परिसरातील शेतकरी मजुर वर्गात नागरिकांत दहशत निर्माण झाली होती खेळ माळी शिवारात सिंचन असल्याने कांदा गहु उस हरबरा आदि पिकांची रानडुक्कर , माकड नासाडी करुन नुकसान करतात पशु पासुन निघा राखन राखण्यासाठी दिवस रात्र पहानी करण्यासाठी शेतकरी मळ्यात राहतात दि ७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान बंडडू तायडे यांच्या शेतात तर रात्री १२ वाजता दरम्यान माळी पंच मठ मंदिर परिसरात दसोरे पुजारी कुटुंबांना अस्वलाचे प्रत्येक्ष दर्शन झाले अस्वल पाहताच संबंधीत शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने शेतालगत असलेले शेत असलेले शेतकरी मदतीसाठी धावुन आले आरडा ओरड करुन पळवुन लावल्याने घटना स्थळा वरुन पांढरीकडे अस्वल निघुन गेला होता दोन दिवस पातुर्डा परिसरात शेतात शेतकरी मजुरांने अस्वल दिसल्याची चर्चेला उधान आले होते ठिकाण बदलत असल्याने अस्वलास पकडने शक्य होत नव्हते शेतकरी मजुर नागरिकांत दहशत कायम होती वन विभागाला माहिती मिळाल्या वरुन वनपाल प्रमोद पाटील , वनकर्मचारी एस पी देवकर , पि एच चितोडे यांनी खेळ माळी शिवारात शोध मोहिम राबवली एका शेतात अस्वलाच्या पाऱ्यांचे ठसे घेऊन शोध घेतला गजानन धर्माळ यांच्या उसाच्या मळ्यात अस्वल मिळून आला मात्र रेस्क्यु टिम व साहित्य अभावी व रात्रीचा अंधार असल्याने अस्वला पकडने शक्य झाले नाही मात्र वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पातुर्डा येथे रात्री मुक्कामी तळ ठोकुन होते अखेर तिसऱ्या दिवशी बुलडाणा वरुन रेस्क्युटिम पातुर्डा येथे दाखल झाल्यानंतर शेतकरी रमेश दाभाडे , वासुदेव पारिशे यांनी सिता माता मंदिर परिसरातील एका पळीत शेतात असल्याची माहिती दिल्या वरुन उपवन सरक्षण अधिकारी गजभिये यांच्या मार्गदर्शनात व.प अधिकारी कटारीया , वनपाल प्रमोद पाटील , दंडे , तऱ्हेकर , वनरक्षक अर्जुन खेळकर , बोंबटकार ‘ बुधवंत , घुईकर , देवकर वन मजुर चितोळे , वनपाल आदि मजुर यांच्या सहकार्याने शोध मोहिम राबवुन परिसर पिंजुन काढला सितामाता मंदिर परिसरात एका पळीत शेतात रेस्क्यु टिम पथक बुलडाणा मळावी , मेरत , वनपाल व वनमजुर यांनी अस्वलास एका पिंजऱ्यात जेरबंद करुन पशु प्राथमिक आरोग्य केंन्द्रांचे पशुवैधकिय अधिकारी डॉ ए जी शेंडे , डॉ ए. ए. पटेल यांनी अस्वलाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर रेस्क्यु पथक वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा अस्वलास सातपुडा पर्वतात सोडण्यासाठी रवाना झाले
