HomeUncategorizedसय्यद बबलू यांच्या दोन लघूपटांना पुरस्कार..!!

सय्यद बबलू यांच्या दोन लघूपटांना पुरस्कार..!!

आष्टी (पठाण शाहनवाज ) तेजवार्ता न्युज अँण्ड इंटरटेनमेंट / तेजवार्ता फिल्म्स ची निर्मीती असलेल्या व्हाईरस व लालसा या लघुपटांना अहमदनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फिल्म फेस्टीवल मध्ये बेस्ट फिल्म प्रॉडक्शन चे पुरस्कार मिळाले आहे . -राज्यभरातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देता यावा, तसेच त्यांनी अजून सुंदर पद्धतीने आप-आपले विचार मांडावे व सामाजिक जनजागृती साठी समाज उपयोगी लघुपट निर्मिती करावी या साठी सामाजिक जनजागृती फिल्म फेस्टिवल चे आयोजन अहमदनगर येथील यश ग्रॅण्ड हॉटेल येथे करण्यात आले होते.या वेळी निवड झालेल्या लघुपटांच्या लेखक/निर्माते/दिग्दर्शक/ कलाकारांना आयोजक सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, हेल्पिंग हँडस युथ फाउंडेशन व बि. बि.फिल्म प्रोडक्शन च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या लघुपट महोत्सवात एकुण १३ लघुपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले . यावेळी तेजवार्ता फिल्म प्रॉडक्शन च्या लालसा व व्हाईरस लघूपटांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली . या दोन्ही लघुपटांना बेस्ट प्रॉडक्शन चा सन्मान मिळाला . मान्यवरांच्या हस्ते तेजवार्ता न्युज नेटवर्क अँण्ड फिल्म प्रॉडक्शन चे मुख्य संपादक तथा निर्माते सय्यद बबलूभाई व दिग्दर्शक अनिस मोमिन यांनी पारितोषीक स्विकारले . तेजवार्ता फिल्म्स प्रॉडक्शन ने यापुर्वीही बळी , कट्टा , भेद , हेल्पींग हॅण्डस , मास्क आदी लघूपट निर्मीती करत ग्रामीण कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे . या टिम मध्ये निर्माते डॉ . महेश नाथ , दिग्दर्शक अनिस मोमिन , अॅड पोपटराव चव्हाण , माजी सरपंच राजाभाऊ शेळके , आयुब मोमिन , समीर मोमीन , दादासाहेब उदावंत , डॉ . देविदास मोरे , रखमाजी काळे , अशोक अडागळे , अनिल मोरे , अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे , पुजा विश्वकर्मा , पुनम , कविता गायकवाड, डॉ अमोल चौधरी , करण अर्जुन , इरफान पठाण , माजिद खान , अशोक पायमोडे , सफर सय्यद , दादा अडागळे , सय्यद हाफीज ( बाबा ) आदी कलाकार तसेच कॅमेरामन शेख हमजान , महादेव वामन , मच्छींद्र विटनोर , आदी कलाकारांचा समावेश आहे . तेजवार्ता च्या माध्यमातुन मराठवाड्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात . ग्रामिण कलाकारांना चित्रपट निर्मीतीची प्राथमिक माहिती व्हावी यासाठी भव्य कार्यशाळाही यापूर्वी घेण्यात आली होती . लवकरच तेजवार्ता फिल्म प्रॉडक्शन तर्फे मराठवाडा लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी निर्माता / लेखक /संपादक सय्यद बबलूभाई यांनी सांगीतले . ग्रामिण कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी तेजवार्ता टिम नेहमीच सक्रिय राहील असेही ते म्हणाले .या वेळी लेखक/निर्माता/दिग्दर्शक तथा आयोजक भैय्यासाहेब बॉक्सर, डॉ.गोपाळ बहुरूपी (पाटिल),जेष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दैनिक नवा मराठा चे संपादक सुभाषजी गुंदेचा,सुप्रसिद्ध छायाचित्रकार वाजिद शेख,संस्थेच्या सल्लागार हिना शेख,कायदे सल्लागार ऍड.परवेज पटेल,युवा उद्योजक पप्पू सेठ इनामदार, अभिनेते हनिफ शेख,गायक अस्लम शेख,किरण बोरुडे , बाळासाहेब शेंदूरकर , महादेव वामन , शेख हमजान आदी मान्यवर व कलाकार उपस्थित होते. सर्व टिम चे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments