HomeUncategorizedकाका - पुतण्या च्या वादात बीड शहराची वाट लागली ; खालेक पेंटर..!

काका – पुतण्या च्या वादात बीड शहराची वाट लागली ; खालेक पेंटर..!

बीड : गेल्या १० वर्षात विकासाच्या गप्पा ऐकून कान सुन्न झाले आहेत . गेल्या १० वर्षात काका पुतण्याच्या वादात बीड शहराची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे . याचा हिशोब आता जनता मागणार आहे . डॉ . भारतभूषण क्षीरसागर हे नैतिकतेच्या आधारावर जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत का ? असे पत्रक माजी नगरसेवक अब्दुल खालेक पेंटर यांनी प्रसिध्दीस दिले आहे . पत्रकात म्हटले आहे की , माजलगाव आणि पाली हे दोन्ही तलाव तुडूंब भरलेले असताना जनतेला १५ दिवसाला पाणी काय मिळत आहे . पुतण्या उपाध्यक्ष व स्वच्छता सभापती असताना शहरात घाणीचे साम्राज्य याला जबाबदार कोण ? कत्तलखाना 1 बांधण्यासाठी केंद्राने २ कोटी ५६ लाख रूपयाचा निधी बीड | नगर पालिकेला दिला होता , त्याचे झाले ? कत्तलखान्यासाठी शहराच्या बाहेर वायभटवाडी येथे नगर पालिकेने चार एकर जमिन घेतली होती . त्यावर कत्तलखाना का बांधला नाही ? नगर पालिका अधिनियम १ ९ ६५ प्रमाणे शहराचा कचऱ्यापासून घनकचरा करण्यासाठी नगर परिषदेचे टिचींग ग्राऊंड आहे का ? घनकचऱ्यासाठी कोट्यावधी रूपये आले ते कुठे गेले ? कलम २६६ , २७० प्रमाणे कोंडवाडा बांधणे बंधनकारक असताना ३० वर्षात कोंडवाडे बांधले नाहीत . कलम २ ९ ३ प्रमाणे मोकाट कुत्र्याला सुधारित नियमाप्रमाणे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त का केला नाही ? कलम २ ९ ४ , २ ९ ५ नूसार डुकरे पाळणाऱ्यावर आपण नियंत्रण का ठेवले नाही ? पाईपलाईनचे २० कोटी रूपयांच्या टेंडरचे ई – टेंडर न करता नियमबाह्य ८ तुकडे पाडून ५४ टक्के जास्त दराने टेंडर नगर परिषदेने आपण का दिले नाहीत ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनता मागणार आहे . नगराध्यक्षांनी याची उत्तरे द्यावीत असे खालेक पेंटर यांनी पत्रकात म्हटले आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments