HomeUncategorizedबीड:चार मुलांचा वाळू उपसा केलेल्या खाड्यात पडून मृत्यू ,गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार

बीड:चार मुलांचा वाळू उपसा केलेल्या खाड्यात पडून मृत्यू ,गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार

गेवराई : तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे वाळूच्या पाणी असलेल्या खड्ड्यात बुडून चौघांचा मृत्यु ही घटना रविवारी ( दि . 6 ) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली . गेवराई तालुक्यात वाळु मुळे बळींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असताना प्रशासन मुग गिळून गप्प आहे . वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी जी खड्डे केली होती . त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि या पाण्यात बुडून या चौघाचं । दुर्दैवी मृत्यु झाला .
अमोल संजय कोळेकर ( वय 12 ) , बबलू गुणाजी वक्ते ( वय 13 ) , आकाश राम सोनवणे ( वय 11 ) , गणेश नामदेव इनकर ( वय 13 ) या चौघांचा मृत्यु झाला आहे . सिंदफना नदीत मागील अनेक वर्षांपासून वाळूचा सर्रास उपसा सुरु आहे . या ठिकाणी वाळू माफिया प्रशासनाला हाताशी धरुन वाळूची बेसूमार विक्री करत आहेत . दरम्यान शहाजानपुर चकला येथे वाळूसाठी जी खड्डे खांदण्यात आली होती त्यात पाणी साठले आणि यातच बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यु झाला . नदीकाठी खेळायला गेलेल्या या चौघांच्या मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान राक्षसभूवन येथे केणी डोक्याला लागल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आणखी चौघे वाळू माफियांमुळे दगावली आहेत . दरम्यान सध्या गावामध्ये तणावाचे वातावरण असून प्रशासन कधी जागे होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments