HomeUncategorizedमांजरसुंबा घाटात अज्ञान वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय मुलगा ठार तर दोघे...

मांजरसुंबा घाटात अज्ञान वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय मुलगा ठार तर दोघे गंभीर जखमी

बीड : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली . यात 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला . 3 फेब्रुवारी रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास मांजरसुंबा घाट उताराला हा अपघात घडला . मयत मुलाचे मामा व आजी गंभीररित्या जखमी झाले . त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत . शेख आयान चांद ( 10 ) असे मयताचे नाव आहे . 3 रोजी दुपारी परंडा ( जि . उस्मानाबाद ) येथील लग्न समारंभ आटोपून शेख सिराज दिलावर ( 25 ) , शेख मीनाबी दीलावर ( 55 ) आणि शेख आयान शेख चांद ( तिघे रा . नेकनूर बार्शी नाका , बीड ) हे सायंकाळी दुचाकीवरुन क्रं . ( एम . एच . 23 बीए -6301 ) बीडकडे येत होते . साडेसातच्या सुमारास मांजरसुंबा घाट उतरत असताना अज्ञात शेख यांच्या दुचाकीला जोराची धडकेत अपघातात शेख आयान चांद याचा = मृत्यू झाला . तर त्याच्यासोबतचे मामा शेख सिराज आणि आजी शेख मीनाबीहे दोघे गंभीर जखमी झाले . त्यांना दुसऱ्या वाहनातून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments