बीड : प्रभाग क्रमांक एकवीस येथील मुतारशा कॉलोनी,सय्यद अली नगर, आरेफ अली नगर,मोहमदिया कॉलोनी, आरिष मस्जिद जवळील भाग येथील विविध समस्या साठी एम आय एम आक्रमक पवित्रा घेत प्रजासत्ताक दिनाच्या आऊचीत्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,त्याचे कारण असे की प्रभागात काही भागात भुयारी गटार योजनेतील चेंबर टाकण्यात आले आहेत जेणे करून त्या ठिकाणची पाईप लाईन फुटून गेली होती म्हणून ती पाइपलाइन नवीन करण्यात यावी,प्रभागात नवीन पाण्याची टाकी करण्यात यावी,प्रभागातील सडलेले कुजलेले पोल काढून नवीन पोल बसविण्यात यावेत,आणि अत्यंत गरजेचे म्हंजे अरिष मस्जिद येथील नाली आणि रस्ता सय्यद अली नगर चा मुख्य रस्ता.आरिफ अली नगरचा रस्ता. मुता रशा कॉलोनी येथील अनेक रस्ते या सर्व प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवत एम आय एम चे नेते हाफीज अशफाक यांनी जिल्हा अध्यक्ष शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्त बार्शी नाक्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु या मागण्या पैकी 70%मागण्या मान्य करत प्रशासनाने अनेक कामांना ही सूरवात केली आहे तरी तसे पत्र ही आम्हाला त्यांच्या वतीने प्राप्त झाले असल्याने होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले याची सर्व प्रभागातील जनतेने नोंद घ्यावी असे पत्रकाद्वारे एम आय एम चे नेते हाफीज अशफाक यांनी कळविले आहे
एम आय एम ने आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने सर्व कामांना केली सूरवात ; हाफीज अशफाक..!
RELATED ARTICLES