HomeUncategorizedसमाज सेवक धैर्यशील ढगे यांचे पात्रुड ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण

समाज सेवक धैर्यशील ढगे यांचे पात्रुड ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण

माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथील ग्रामपंचायतीत दलितांचा द्वेष करणाऱ्या ग्रामसेवक सुधाकर गायकवाड तसेच सरपंचाची चौकशी करून त्यांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्यात यावेत व विविध कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच इतर मागण्यांसाठी पात्रुड येथील समाज सेवक तथा पत्रकार धैर्यशील ढगे आज दि. २५ जानेवारी मंगळवार रोजी ग्रा.पं.कार्यालय पात्रुड समोर अमरण उपोषणास बसले आहेत. या विषयी माहिती की, पात्रुड ग्रामपंचायतीत सन २०१८ ते २०२१ मध्ये जि.प.च्या माध्यमातुन विविध प्रकारच्या विकासकामात ग्रामसेवक सुधाकर गायकवाड व सरपंच यांनी संगनमत करुन कामे पूर्ण न करताच निधीमध्ये अपहार करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून. ग्रामपंचायतीला १४ व १५ व्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला होता, तसेच बाजार लिलाव,व्यापारी संकुल यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. याचा हिशोब ग्राम किंवा मासीक सभेत दिला जात नाही तर ती रक्कम विकास कामांच्या नावाखाली हडप केली जाते. सदरची विकास कामे कागदोपत्रीच सोपस्कार करुन त्याची बीले उचली गेली आहेत. एवढच नाही तर ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून गुत्तेदारी केली आणि गावातील दलित वस्तीला सुविधां पासुन वंचीत ठेवले आहे. याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पात्रुड येथे उपोषणास बसलेले समाज सेवक तथा पत्रकार धैर्यशील ढगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ठीक ३:३० वा. उपोषण स्थळी आलेले विस्तार अधिकारी पंचायत समिती माजलगाव श्री. रोडेवार यांच्याशी चर्चा करत असताना पंचा समक्ष वरील सर्व मागण्यांचे मुद्दे चर्चा करत असताना सांगितले असून.

मयत सदस्याच्या जागी पोटनिवडणुकीसाठी अहवाल सादर केला नाही.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीचे निधन त्याच्या कार्यकाळात झाले तर त्या ठिकाणी पोटनिवडणुक ६ महिन्यांत घेतली पाहिजे असे आदेश असतांनाही पात्रुड येथील अनुसुचित जाती प्रवर्गातून निवडुन आलेले ग्रामपंचायत सदस्य संघर्ष धैर्यशील ढगे यांचे निधन २४/०२/२०२१ ला झाले होते पण त्या ठिकाणी पोटनिवडणुक घेण्याचा अहवाल आजतगायत ग्रामसेवक व सरपंचानी गटविकास अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केलेला नाही. म्हणुन पर्यायाने अनुसुचित जाती च्या सदस्याची जागा रिक्त ठेवल्यामुळे अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेच पाहिजेत. या सर्व मागण्यांसाठी समाजसेवक तथा पत्रकार धैर्यशील ढगे हे ग्रामपंचायत पात्रुड समोर अमरण उपोषणास आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments