HomeUncategorizedनिर्भिड संपादक जालिंदर धांडेंचा होणार गौरव...!

निर्भिड संपादक जालिंदर धांडेंचा होणार गौरव…!

बीड : सायं.दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांना पुरोगामी पत्रकार संघ, केजच्या वतिने उत्कृष्ट, निर्भिड संपादक पुरस्कार जाहिर करण्यात असून, हा पुरस्कार सोमवारी (ता. 31) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती देण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुरोगामी पत्रकार संघ, केजच्या वतिने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.या संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता, प्रशासकीय, सामाजिक,आरोग्य, शैक्षणीक, क्रीडा, पर्यावरण आणि साहित्य या क्षेत्रात यशस्वीपणे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन यात पञकार जीवनगौरव पुरस्कार केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर दादा सिरसट, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे दबंग पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार डॉ.गणेश ढवळे लिंबगनेशकर व श्रीमती.अनिता कांबळे, उत्कृष्ट निर्भिड संपादक पुरस्कार जालिंदर धांडे, शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार श्री.वसंत तरकसबंद, आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्कार डॉ.अरुणा केंद्रे, उत्कृष्ट महिला समुपदेशक पुरस्कार सौ.जनाबाई खाडे, पर्यावरण विषयक पुरस्कार श्री.डॉ.हनुमंत सौदागर, उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार कूमारी. प्रियंका इंगळे आणि साहित्य क्षेत्रातील युवा साहित्यक पुरस्कार कवी किशोर भालेराव आदी मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मूकनायक दिनानिमित्त साजरा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.विजय सुर्यवंशी व विविध मान्यवरांच्या विशेष उपस्थिती प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments