औरंगाबाद : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे 2022 चे ठाणे ते होणारे राज्य अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यऑनलाईन बैठक कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्य यसंघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे ,उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव संजय पावशे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना सुनील पाटणकर व श्री बालाजी पवार यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन 26 व 27 जानेवारी 2022 रोजी ठाणे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात covid-19 ची तीव्रता आणखी वाढली आहे तिसरी लाट धोकादायक स्वरूप वाढती रुग्ण संख्यालक्षात घेता शासनाने सर्वच जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत शासनाच्या आदेशानुसार केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन घेणे संयुक्तिक होणार नाही त्यामुळे ठाणे येथे होणारे 26 व 27 जानेवारी चे राज्य अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून कोव्हीडची परिस्थिती निवळल्यानंतर चर्चा करून अधिवेशनाची तारीख नव्याने जाहीर केली जाईल.या बैठकीत राज्य संघटनेने सुरू केलेल्या ॲप बाबत पुन्हा एकदा माहिती देण्यात आली आत्तापर्यंत राज्य संघटनेशी संलग्न असणाऱ्या सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे पूर्तता करून संघटनेची नोंदणी ऑनलाइन रित्या पूर्ण करण्याचे आहे व त्यानंतर आपल्या भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांची या ग्रुप वरती ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्रे मिळणार आहेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीत ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या प्रश्नांवर ही चर्चा करण्यात आली ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळावा अशीच भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली व गरज पडल्यास ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला यासह इतर काही प्रश्नांवर या ऑनलाईन बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस दत्ता घाडगे ठाणे ,गोपाळ चौधरी जळगाव, रवींद्र कुलकर्णी ,मालेगाव अंबादास खेडकर परभणी, यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते.
महाराष्ट्रराज्य वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे २६ -२७ जानेवारी रोजी होणारे राज्य अधिवेशन स्थगित!
RELATED ARTICLES