बीड : जमियत-उलेमा-ए-हिंद (अर्शद मदनी) यांच्यावतीने बीड शहरातील तिसरे हॉस्पीटल बालेपीर भागात सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी मुफ्ती रिजवान साहब चर्तुवेदी, ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर आणि भन्ते सुमित बोधी महाथेरो महाराज या प्रमुख धर्मगुरू, संत-महंतांच्या हस्ते अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. हॉस्पीटल उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित धर्मगुरू आणि संत-महंतांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे.बीड येथील बालेपीर भागात आज सकाळी अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटलचे उद्घाटन प्रमुख धर्मगुरू आणि संत-मंहतांच्या उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर मुफ मुफ्ती रिजवान साहब चर्तुवेदी, ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर आणि भन्ते सुमित बोधी महाथेरो महाराज यांच्यासह जमियत-उलेमा-ए-हिंद चे मराठवाडा अध्यक्ष हाफेज जाकेर सहाब, मौ.बाकी साहेब,उपनगराध्यक्ष हेंमत क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गटनेते फारूक पटेल,एम.आए.एम. जिल्हाअध्यक्ष अॅड.शफिक भाऊ, नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे सदस्य समिर काझी, नियोजन समिति सदस्य तथा मा. सभापती खुर्शीद आलम, गौतमजी खटोड, राजेशजी बंब, अतुलजी संघानी, भाजपचे इरशाद भाई,बंकटराव शिंदे, सुरेश तात्या शेटे, नगरसेवक सादेक भाई, मोसीन भाई, बाबा भाई,अलीम पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमीर शेठ, एजाज मौलाना, हाफेज वासेद भाई, मौलान मोहसीन, मुशाहेद काझी, माजेद भाई आदींनी परिश्रम घेतले. सदरील हॉस्पीटल समाजसेवक, उद्योजक जमीर शेठ व त्यांच्या टिम अतंर्गत चालवण्यात येणार असुन जमियत-उलेमा-ए-हिंदच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत माफक दरात सर्व समाजातील गोरगरीब रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. केवळ 30 रूपयांमध्ये तपासणी आणि औषधी दिली जाणार असल्याचे जमीर शेठ यांनी सांगितले.
एकात्मेचा संदेश देत अंजुमने हिदायतुल इस्लाम हाॅस्पिटलच उदघाटन संपन्न!
RELATED ARTICLES