HomeUncategorizedप्रभाग क्रमांक १२ मधील गरजूंनी शिवभोजन थाळी चा लाभ घ्यावा - शेख...

प्रभाग क्रमांक १२ मधील गरजूंनी शिवभोजन थाळी चा लाभ घ्यावा – शेख मोहसीन

बीड : बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये गणेश उगले यांनी नुकतेच शिवभोजन थाळी केंद्र सुरू केले. याचा प्रभागातील गोरगरीब गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन यानिमित्त प्रभाग क्रमांक १२ तील सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.शहरात अन्य ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू असले तरी प्रभाग क्रमांक १२ मध्ये आजपर्यंत शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले नव्हते. परंतु नुकतेच शिवसेना नेते तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश उगले यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील कालिका नगर वेशीच्या बाजूला शिवभोजन थाळी केन्द्र सुरू केले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभामध्ये परिसरातील नागरिक उपस्थित होते. तेव्हा आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते मोहसीन यांनी शिवभोजन थाळी बद्दल माहिती देताना म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेने उपाशी राहू नये म्हणून फक्त १० रुपयात शिवभोजन थाळी देण्याची योजना सुरू केली. ज्यामध्ये एका शिवभोजन थाळी केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जनतेसाठी शिवभोजन थाळी देण्यात येते. गोरगरीब गरजूंना ही थाळी जरी १० रुपये देऊन मिळत असली तरी प्रत्येक थाळीला राज्य शासनाकडून ४० रुपये अनुदान मिळत असल्याने केंद्र चालविणाऱ्याला एका थाळीचे ५० रुपये मिळतात. यामुळे गरजूंनी शिवभोजन थाळी घेऊन खाताना हा विचार करू नये कि, १० रुपयात जिथे आजच्या युगात फक्त चहा मिळतो, तिथे जेवण ते काय मिळणार ? प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावर दररोज ४ तासांमध्ये १०० शिवभोजन थाळी देण्याची मर्यादा शासनाने घालून दिलेली आहे. बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये हातावर पोट असणारे अनेक गरजूवंत कामगार राहतात. अशांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा. तसेच या शिवभोजन थाळी केंद्राची सुरुवात करणाऱ्या गणेश उगले यांचे अभिनंदन करून या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन म्हटले की, शिवभोजन थाळी खाणाऱ्यांना चांगले दर्जेदार अन्नपदार्थ बनवून खायला द्यावेत आणि गणेश उगले यांचा आतापर्यंतचा सामाजिक आणि राजकीय प्रवास पाहता ते निश्चितपणे हे शिवभोजन थाळी केंद्र उत्तमरीत्या चालवतील आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चांगली दर्जेदार शिवभोजन थाळी दररोज खाऊ घालतील. अशी अपेक्षाही यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी व्यक्त केली यावेडी प्रभागा तील शिवसंग्राम पार्टी चे युवा नेते नदीम भाई, लोक्सेना संघटनेचे तालुका अध्यक्ष अतीक अहमद खान,ज्येष्ठ नागरिक जमील खान,अजहर भाई, व इतर नागरिकांची उपस्थिति होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments