मुंबई : वातावरणात सूर्याच्या संक्रमणातून होणारे बदल स्वीकारून समाजात एकता व गोडवा निर्माण करणारी मकरसंक्रांत साजरी करू असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मकरसंक्रांती निमित्त ‘तीळ गूळ घ्या आणि सर्वांनी एकमेकांशी गोड गोड बोला’ असे म्हणत बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.मकरसंक्रांती हा सण भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य उत्सव असून देशाच्या सर्व भागात विविध नावांनी व वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी या काळात जनतेने दाखवलेला संयम कमालीचा असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. *कोरोना पुन्हा वाढतोय, काळजी घ्या* दरम्यान मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते. परन्तु गेल्या काही दिवसातच पुन्हा दोन आकडी संख्या धारण केली असून, वरचे वर ही संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी व मुलांनी लसीकरण तसेच बूस्टर डोस साठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावेत व मास्क सह सर्व नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
वातावरणातील बदल स्वीकारत समाजात एकता व गोडवा वाढविणारी मकरसंक्रांत साजरी करू ; धनंजय मुंडे!
RELATED ARTICLES