पात्रुड : माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील अब्दुल फकिन अब्दुल अलीम सिद्दिकी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव येथे फिर्याद दिली की दि. २/१/२०२२ रोजी रात्री ११ ते दि. ३/१/२०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान पात्रुड येथील तेलगाव रोडवर उभा असलेला अलीम करीम शहा यांचा आयशर क्र. MH-15 CK 7715 किंमत अंदाजे तीन लाख रुपये व टेम्पोमध्ये भरलेला कापूस ६५ क्विंटल ज्याची अंदाजे किंमत ९००० प्रति क्विंटल रुपये प्रमाणे ५ लाख ८५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयाचा माल चोरी गेल्याची फिर्याद माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०२/२२ कलम३७९,३४ भा.द.वि. प्रमाणे दाखल होती. याचा तपास अंमलदार एस. आर. आईट वाड यांच्याकडे होता. या घटनेच्या तपासामध्ये माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला टेम्पो क्र. एम. एच. १५ सी.के. ७७१५ हा पांगव्हाण ता. वैजापुर जिल्हा औरंगाबाद शिवारात खंडाळा ते परसोडा जाणाऱ्या रोडवर उभा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय सिंग जोनवाल यांना मिळाल्यानंतर तात्काळ सदर ठिकाणी गेले असता. त्या ठिकाणी टेम्पो रिकाम्या स्थितीत मिळून आला आस्था पंचा समक्ष तो जप्त करण्यात आला असून. सदर ठिकाणी माहिती घेतली असता टेम्पो मध्ये असलेला कापूस हा दोहेगाव तालुका वैजापुर शिवारातील भाग्योदय जिनिंग मध्ये विकला गेला असल्याची माहिती मिळाली असता. तिथे चौकशी केल्या दरम्यान सदर टेम्पो तील कापूस हा विठ्ठल बाळासाहेब खैरनार रा. हनुमंत गाव यांनी आणून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली असून. सदर प्रकरणामध्ये आरोपीची चौकशी करण्यात आली असता आरोपीने चौकशीदरम्यान गुन्हा कबूल केलेला असून. त्याने चौकशी दरम्यान त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली आहेत त्यांचा शोध ग्रामीण पोलीस हे करत आहेत. सदर प्रकरणातील सर्व मुद्देमाल हा ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव यांनी हस्तगत केलेला असून या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.सदर कार्यवाही ही बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. ए.राजा, एडिशनल एसपी अंबाजोगाई नेरकर मॅडम, डीवायएसपी श्री. जायभाये, पोलीस निरीक्षक श्री प्रकाश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. विजय सिंग जोनवाल ए.एस.आय. आईटवार, पो. ना. संजय राठोड ब. नं.१४८६ पो. ना. तुकाराम ढोबळे १४९६ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून.त्यांच्या या कामगिरी बद्दल पात्रुड पंचक्रोशीतील जनतेमधून कौतुकाचा वर्षाव होत असून.पात्रुड परिसरामधील जनतेचा पोलिसांप्रती आत्मविश्वास वाढलेला आहे. या कामगिरीबद्दल समस्त पात्रुड येथील गावकरी ग्रामीण पत्रकारां मधून पोलिसांचे आभार व्यक्त केले जात असून समाधान व्यक्त होत आहे.
