बीड : सोमवारी जिल्हाभर चर्चिला गेलेल्या कार्यकारी अभियंता यांनी रिव्हॉल्वरची मागणी करणाऱ्या विषयाचे पडसाद आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. एखाद्या अधिकाऱ्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अंबाजोगाई शहराची व पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी करणे योग्य नसल्याचे सांगत खा. सौ. रजनीताई पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
आपल्या पदाचा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर करून प्रामाणिक काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या बीड जिल्हा नियोजन समिती व सर्व लोकप्रतिनिधी पाठीशी राहतील, मात्र जिल्ह्याची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे यावेळी बोलताना श्री. मुंडे यावेळी म्हणाले.