बीड : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड हे नामलगाव फाटा, जालना रोड, बीड याच पत्त्यावर परंतु नवीन इमारतीत दि. 4 जानेवारी 2022 पासून स्थलांतरीत होत आहे. तरी सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांनी कार्यालयीन कामकाजासाठी नवीन पत्त्यावर भेट द्यावी किंवा संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पूर्वीचा पत्ता नामलगाव फाटा, जालना रोड, बीड समान असून फक्त इमारतीमध्ये बदल झाला आहे, याची नोंद घ्यावी. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीडच्या जुन्या इमारतीबाबत नागरिकांसाठी सोयीसुविधा कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व जीर्ण झालेल्या इमारतीच्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कार्यालयीन कामकाजासाठी स्थलांतरीत करण्यात येत आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आजपासून नवीन इमारतीत!
RELATED ARTICLES