बीड : शहरातील बायपास टू बायपास रस्त्याचे काम सध्या सुरू आहे . मोठा गाजावाजा करून काम सुरू केले असले तरी ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे . इस्टीमेटमध्ये एका फुटाचा लेअर असतांना केवळ एक ते दिड इंच लेअर टाकुन बीडकरांच्या आणि शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे . एवढे निकृष्ट काम होत असतांनाही त्या कामाचे श्रेय खासदार आणि आमदार घेत आहेत याची कीव येते असा आरोप करत आधी क्वॉलीटीचे काम करा आणि मगच श्रेय घ्या असा सल्ला शेख निजाम यांनी दिला आहे . तब्बल १५ वर्षांच्या मागणीनंतर या रोडचे काम होत आहे . त्यामुळे प्रशासन , मंत्री , खासदार , आमदार आणि माजी मंत्र्यांना हात जोडुन विनंती आहे . केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचे रस्ता कामाच्या बाबतीतील नाव देशातच तर जगात आहे . मात्र १२ किलोमीटरचा थातुरमातुर रस्ता करून केंद्रीयमंत्री गडकरींचे नाव खराब करू नका , निधी नसेल तर अर्धेच काम करा पण ते क्वॉलीटीचे करा . पुन्हा, पुन्हा हा रस्ता होणार नाही . हा निधी केंद्राने दिला असेल तर आमदारांनी अर्धा निधी राज्याकडून आणावा , हे काम करावं मग दोघांनीही श्रेय घ्यावं . असेही शेख निजाम यांनी म्हटले आहे . लॉ कॉलेज ते लक्ष्मी टॉकीजपर्यंत ईस्टीमेट प्रमाणे एका फुटाचा लेअर टाकुन क्वॉलीटीचा रस्ता करा अन्यथा आम्ही काम बंद पाडू असा ईशाराही त्यांनी दिला आहे . एवढेच नव्हे तर पैशे नसतील तर बीड शहरातील नागरीकांकडून एक – एक , दोन दोन रूपये जमा करून आम्ही देवु पण रस्त्याच्या क्वॉलीटीमध्ये तडजोड करू नका असेही शेख निजाम यांनी म्हटले आहे .बायपास टू बायपास हा रस्ता टिकणारा नसून शहरात सिमेंट रस्ता होणे आवश्यक आहे . हा रस्ता बऱ्याच वर्षानंतर होत असून ..तो चांगलाच झाला पाहिजे अन्यथा संपूर्ण बीडकर आंदोलन उभा करतील असा इशारा बीड शहर दर्जेदार रस्ता कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे . यावेळी एमआयएमचे निजाम शेख , आम आदमी पार्टीचे अशोक येडे , शिवसंग्रामचे नंदू पिंगळे यांच्यासह हनुमंत पवार , सातीराम ढोले , मोमीन जुबेर , सय्यद सनाउल्ला खयूम इनामदार , सय्यद रेहमान आदींसह बीड शहरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.
बायपास टू बायपास रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट – निजाम शेख
RELATED ARTICLES