HomeUncategorizedइनामी जमीन खालसा करणाऱ्या भुमाफियांसह उपजिल्हाधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करा ; खालेक...

इनामी जमीन खालसा करणाऱ्या भुमाफियांसह उपजिल्हाधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करा ; खालेक पेंटर

बीड : माजलगांव तालुक्यातील पात्रुड येथील मस्जिद सोटेपीरची ६१ एक्कर २ गुंठे इनामी जमीन खालसार कारणाऱ्या भुमाफियासह उपजिल्हाधिकारी ( सामान्य ) यांच्याविरूध्द फौजदारी खटले दाखल करून खालसा आदेश तहकुब करावे अशी मागणी हाजी अब्दुल खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे . बीड येथील हाजी अब्दुल खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , पात्रुड येथील मस्जिद सोटेपीरची महाराष्ट्र शासना राजपत्रामध्ये नोंद असुन त्या गॅजेट प्रमाणे सर्व्हे नं . ९ ३ मध्ये एक्कर १८ गुंठे , सर्व्हे नं . ९ ४ मध्ये ७ एक्कर ३ गुंठे , सर्व्हे न .२५ मध्ये १२ एकूण २० गुंठे , सर्वे नं . १०१ मध्ये १० एक्कर १७ गुंठे , सर्व्हे नं . १०२ मध्ये २२ एक्कर २४ गुंठे असे एकुण ६१ एकर २ गुंठे जमिनची नोंद राजपत्रात आहे ही जमीन मस्जिदीची मशरतुल्ल खिदमत इनामी जमीन आहे . सदर जमीनीचा कायदा प्रमाणे खालसा करत येत नाही . हैद्राबाद इनाम निर्मुलन व रोख अनुदान कायदा १ ९ ५४ चे कलम २ – ए आणि ( २ ) प्रमाणे मदत माष असल्यास प्रतिबंधीत मालकी जाहीर करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी सामान्य , भुसुधार यांना आहे . मात्र माजलगांवचे उपजिल्हाधिकारी ( सामान्य ) यांनी मस्जिद सोटेपीरची खिदमत माष जमीन मदत मा दाखवुन भुमाफियांनी सादर केलेल्या खोट्या कागदपत्राआधारे ६१ २ गुंठे जमीनीचा खालसा करून उल्लंघन केले आहे . याप्रकरणी सर्व पुरावे असताना देखील उपजिल्हाधिकारी ( सामान्य ) यांच्या कोर्टात नजर अहेमद हसनजी कुरेशी , शेख पाशा शेख अहेमद आणि मिर्झा आसेफ बेग यांच्या अर्जावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी खिदमत माष जमीनीला मदत माष जाहीर करून मस्जिदचे नुकसान केले आहे . या प्रकरणी पात्रुड येथील मस्जिद सोटेपीरच्या इनामी जमिनीसह जिल्ह्यातील सर्व मस्जिद , दर्गाह आणि देवस्थानच्या इनामी जमिनीचे झालेले बेकायदेशीर खालसे चौकशी करून रद्द करावेत आणि भुमाफियांवर फौजदारी खटले दाखल करावेत अशी मागणी खाले पेंटर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक , वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments