मुंबई : चंदीगढ़ येथे संपन्न झालेल्या 5 वी राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र खेळाडूंनी सुवर्ण पदक व प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादीत केले दिनांक. 28 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 रोजी डीएव्ही स्कूल पब्लिक कॅम्पस चंदीगढ येथे झालेल्या झारखंड विरुध्द महाराष्ट्र या सामन्यात झारखंड या संघाला 4-3 ने मात देवून यश संपादन केले आहे. या यशस्वी खेळाडूंचा व अॅमेच्योर फेडरेशन ऑफ रोलर बॉस्केटबॉल असोसिएशन, इंडिया सचिव, श्री.बलविंद्रसिंघ जोहाल व महाराष्ट्र रोलर बॉस्केटबॉलचे अध्यक्ष सय्यद निसार व उपाध्यक्ष देवानंद नेमाने, सचिव इमरान खान व लायक सय्यद, सतनाम सिंग जसपाल. यांच्या हस्ते पदक देवून सत्कार व सन्मान करण्यात आले. रोलर बॉस्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे डीएव्ही स्कूल पब्लिक कॅम्पस चंदीगढ येथे 9 राज्यातील संघानी भाग घेतला होता.या संघात प्रथम महाराष्ट्र, द्वितीय झारखंड व तृतीय पंजाब या संघानी वर्णी लावली होती.महाराष्ट्र संघाने गेल्या तीन वर्षापासुन सातत्य पदक पटकाविले आहे पण आज महाराष्ट्र संघाने हे प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावुन महाराष्ट्र व महाराष्ट्र रोलर बॉस्केटबॉल असोसिएशनच्या नाव उज्वल केले आहे. या संघात वयोगट- 11, 14, 17, 19, मुले – मुली सहभाग होते या स्पर्धेचे आयोजन अॅमेच्योर फेडरेशन ऑफ रोलर बॉस्केटबॉल असोसिएशन, इंडिया तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात वेगवेगळे जिल्ह्यातील 50 खेळाडूंचा वर्णी लागली होती. या स्पर्धेत राज्याच्या संघाच्या यशात स्थानिक खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या संघानी अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन स्पर्धेचे महाराष्ट्र प्रथम विजेते पद पटकाविले व घवघवीत यशाबद्दल या खेळाडूंचा सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.या संघामध्ये नांदेड, लातूर, जालना, बुलढाणा चंद्रपुर, यवतमाळ, या जिल्हयातील खेळाडू सहभाग होती. *विजय झालेले खेळाडूंची नांवे* : – विपाशना कांबळे , गौरी दमकोंडवार , अंतरा गजभारे , सृष्टी तोष्णीवाल , अर्पिता गाडचेलवार , पुजा गज्जलवार , प्रतिक्षा गज्जलवार , स्वरीज तावडे , वरद कल्याणी , चैतन्य बसवदे , ऋतिक नागेश्वर प्रसाद कंकाळ , संकशेत कांबळे , श्रेयांश वांगीकर , मैत्रे कांबळे , केवल्य चिद्रावार , विशाल देशमुख , आदित्य कांबळे , संदेश शर्मा , कार्तिक स्वामी , चैतन्य नवद , अभिषेक नागसाखरे , मुद्दस्सीर चाऊस , सार्थक जैन , दिवेश अग्रवाल , नैतिक ठेंग , लोकेश कोठारी , प्रणव भालेकर , मयन ठेंग , सर्वेश वायाळ , संकेत पवार , दिशा दिक्षीत , राजवीर बर्डे , दिव्यांशू रागीट , पर्थ नवघरे , अंशुमन इंगळे , अश्वित नामनवार , प्रवीर सुवर्णा , सय्यद जैद , इब्राहिम शाकीर , तनिशा उमाळे , रोधा बुग्गेवार , स्वानंदी बर्डे , निविदेता शाहू , अयान मिर्झा , तक्ष चहानकर , आदित्य कुबेर , यशोदा माने , अमान आसिफ शेख , श्रध्दा गुंड , प्रदिप माने , इत्यादी खेळाडूंचा समावेश होता या विजयी खेळाडूंना हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
राष्ट्रीय रोलर बॉस्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदका सह मिळवीले घवघवीत यश!
RELATED ARTICLES