पात्रुड : (प्रतिनिधी नईम आतार )तालुक्यातील गंगामसला शिवारातील शेतकरी गोपिनाथ खेत्री यांच्या शेतात शेत रस्ता करण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी तहसीलकार्यालयात सादर केलेला पंचनामा अहवाल खोटा असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे तक्रार निवेदन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे यांनी दिल्यानंतर त्याची चौकशी करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे प्रकरण माजलगाव तहसिलचे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सैदाराम तुकाराम कुंभार कडे होते. या प्रकरणात मंडळाधिकारी यांच्या बाजुने अनुकुल अहवाल सादर करण्यासाठी अशोक नरवडे व ५-६ महिन्यात सेवा निवृत होणारे नायब तहसीलदार सैदाराम कुंभार यांनी संगनमत करून संबंधित मंडळाधिकारी यांच्या कडे १ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ती मागणी संबंधीत मंडळाधिकारी यांनी मान्य केली आणि बीड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक यांच्या कडे तक्रार दिली होती यावर उपअधीक्षक भारत राऊत यांनी सापळा रचुन ३१ डिसेंबर शुक्रवार रोजी च्या दुपारी १ वा. माजलगाव तहसिल कार्यालयात मंडळाधिकारी यांच्या हस्ते नायब तहसीलदार सैदाराम तुकाराम कुंभार व शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे यांना १ लाख रुपयांची लाचघेतांना रंगेहात पकडुन ताब्यात घेतले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कामगिरीत भारत कुमार राऊत यांच्या नेतृवाखाली पो.नि.रविंद्र परदेशी, जमादार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत गोरे, निकाळजे,खरसाडे सह चालक म्हेत्रे सहभागी झाले होते. दरम्यान सदरील शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक नरवडे यांनी अश्या अनेक प्रकरणात निवेदने, आंदोलने करुन त्यासंबंधितांना ब्लॅक मेल करुन लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याची चर्चा होत आहे तर सैदाराम कुंभार याने पुरवठा विभागात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आहेत.

