HomeUncategorizedग्राहकांनी व्यवहार करतांना जागरूक असणे काळाची गरज प्रमोद टाकळकर

ग्राहकांनी व्यवहार करतांना जागरूक असणे काळाची गरज प्रमोद टाकळकर

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] व्यवहार करतांना ग्राहकांनी दक्ष राहून जागरुकता दाखवावी कारण व्यवहारात विविध आमिषे दाखवुन ग्राहकांच्या फसविणुकीचे प्रमाण वाढल्याची ओरड होत आहे व्यवहार करतांना ग्राहकांनी जागरुक असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वरवट बकाल कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त आयोजीत कार्यक्रमात जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सदस्य प्रमोद टाकळकर यांनी केले ते पुढे म्हणाले कि ग्राहकांनी व्यवहार करतांना जागरुकता दाखवली तरच फसवणुक होणार नाही तेव्हा प्रत्येक नागरिक , विद्यार्थी , ग्राहक यांनी जागरुक राहण्याचे आव्हान त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जगन्नाथ चौधरी हे होते तर व्यासपीठावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुभाष गुर्जर, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. निशिगंध सातव, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सतीश राणे यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष गुर्जर यांनी केले सन 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा आणि 2020 चा ग्राहक संरक्षण कायदा यातील फरक, तरतुदी, ग्राहकांचे अधिकार, याविषयी विस्तृत माहिती दिली. प्रा. निशिगंध सातव यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता या कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदी व न्याय कशाप्रकारे प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ चौधरी यांनी ग्राहक दिनानिमित्त प्रत्येक नागरिकांनी व्यवहार करताना वस्तूबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर वस्तू घेताना बिल घेण्याचा आग्रह धरला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक झाल्यास न्याय मागण्यासाठी आपल्याला बिलाचा योग्य आधार होऊ शकतो. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तर आधारे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. संचालन वैष्णवी लाहुरकार व गायत्री सातव यांनी तर आभार डॉ. संजय टाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. सुरेश भालतडक, प्रा. गजानन सोळंके प्रा. नागेश इंगळे, विजय सपकाळ, राहुल भिलंगे, सौरभ कंडारकर, वैष्णवी भोपळे, वैष्णवी हागे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला नागरिक ,प्राध्यापक विद्यार्थ्यां उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments