प्रसुती रुग्णानाच्या नातेवाईकांना बसतोय आर्थिक भुदंड
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सर्वात मोठे गाव पातुर्डा असुन येथे प्राथमिक आरोग्य केंन्द्र असल्याने गावातील व परिसरातील २३ खेडे गावातील गोर गरीब शेतकरी शेत मजुर प्रसुतीसाठी रुग्ण नातेवाईक या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात येतात प्राथमिक आरोग्य केंन्द्र इमारत नविन होणार असल्याने जमिनदोस्त करण्यात आल्याने फक्त रुग्ण तपासणी झाल्यानंतर उपलब्ध असलेली औषध देण्यात येते प्राथमिक उपचार होत असल्याने व इमारत अभावी प्रसुती होत नसल्याने रेफर करण्याशिवाय पर्याय नाही परंतु प्राथमिक केंन्द्रातील रुग्णवाहिका गेल्या काहि दिवसा पासुन नादुस्त असल्याने रुग्णवाहिका शोभेची वस्तु झाली आहे तालुक्यातील देऊळगाव येथील पाणी पुरवठा कर्मचारी देविदास परघरमोर यांनी मुलगी प्रसुती साठी प्राथमिक आरोग्य केंन्द्रात आणले या प्रा आरोग्य केंन्द्रात सुविधा नसल्याने व त्यात प्रसुती साठी रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला उपस्थीत युवकांनी दे धक्का देऊनही सुरु न झाल्याने गेल्या काहि दिवसा पासुन नादुरुस्त रुग्णवाहिका शोभेची वस्तु झाली आहे त्यामुळे प्रसुती रुग्णाच्या नातेवाईकांना खाजगी वाहनाने प्रवास करुन आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे नादुस्त वाहनामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असुन आरोग्य विभागाच्या गळथान कारभार विषयी तिव्र रोष व्यक्त होत आहे