संग्रामपुर [ प्रतिनिधी ] महात्मा गांधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर रोजगार सेवकांची ग्रामसभेतुन ग्रा प निहाय नियुक्ती करण्यात आली सन २००५ / ६ पासुन रोजगार तुटपुंजी मानधान तत्वार या रोजगार हमी योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामे करित आहेत गेल्या १५ वर्षा पासुन शासन प्रशासनाकडे वेळो वेळी रोजगार सेवकांना कायम सेवेत घेण्याची मांगणी दिर्घ काळा पासुन शासन प्रशासनाकडे रोजगार सेवक कृती समिती कडून होत आहे माजी मंत्री आ डॉ संजय कुटे यांना भेटुन रोजगार सेवकांनी सेवेत कायम समाविष्ट करण्याची मांगणी संग्रामपुर रोजगार सेवक संघटनेने एका निवेदनाव्दारे केली आहे ग्रा प अंतर्गत मनरेगाची सर्व घरकुल , शौचालय , शेतीचे पादन रस्ते , जलरक्षक, जलसंर्वधण , फळबाग लागवड , सिंचन विहिर , शेततळे , सार्वजनिक वृक्ष लागवड , रोपवाटिका आदी लाभान्वयीत कामे कार्यालयीन कामे पारदर्शन रोजगार सेवक करित आहेत शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत विविध योजनाचे उदिष्ट निर्धारीत कामाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात बेरोजगार मजुर वर्गात शासनाच्या उदिष्ट पुर्ती करीत मजुर वर्गात जन जागृती रोजगार उपलब्ध करुन देत असल्याने शहरी भागात मजुरांचे पलायन नियंत्रता करण्यासाठी रोजगार सेवक झटत आहेत या सर्व बाबीचा विचार करुन रोजगार सेवकांना कायम सेवेत समाविष्ट करण्यासाठी रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आ डॉ संजय कुटे यांना भेटुन उपरोक्त मांगणी करण्यात आली यावेळी आ कुटे यांनी आपल्या समस्या शासन दरबारी हिवाळी अधिवेशनात माडून न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी रोजगार सेवक संघटना तालुकाध्यक्ष विनोद उमरकर , ता उपाध्यक्ष देविदास शिंदे , संतोष वानखडे, सुनिल दाभाडे, रामधन खंडेराव वासुदेव गवई , सुभाष वानखडे, बाळकृष्ण बोदडे, गोर्वधन खोंड सत्यभामा चोपडे , शेषराव वानखडे आदी रोजगार सेवक उपस्थीत होते
रोजगार सेवकांना ग्रा.प.मध्ये कायम सेवेत समाविष्ट करा ; रोजगार सेवक संघटनेची मांगणी
RELATED ARTICLES