दोन प्रभागात सर्व साधारण , तर दोन प्रभागात सर्व साधारण महिला
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील नगर पंचायती ओबीसी राजकीय आरक्षण कोर्टाच्या आदेशान्वये निर्वाचन विभागाने स्थगीती दिल्याने ४ प्रभागातील ओबीसी आरक्षणावर निवडणुकीला स्थगीती दिले होते त्यामुळे या नगर पंचायत १७ वार्डा पैकी १३ जागेवर निवडणुक २१ डिसेंबर रोजी शांततेत संपन्न झाले येत्या १८ जानेवारी रोजी ४ प्रभागाचे निवडणूक साठी आज दि.23 डिसेंम्बर रोजी नव्याने आरक्षण साठी संग्रामपुर तहसिल निर्वाचन विभागात प्रभाग निहाय चिट्ट्या काढण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली.१७ प्रभागाचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत मागील काही महिन्यापुर्वी काढण्यात आली होती. १७ पैकी ४ ओबीसी प्रभागाची निवडणूक स्थगित केली होती त्यामध्ये सर्व साधारण प्रवर्ग देण्यात आले आहेत. त्या ४ प्रभागाचे आजच्या आरक्षण सोडत नुसार , प्रभाग ८ मध्ये सर्वसाधारण, प्रभाग १० सर्वसाधारण , तर प्रभाग ११ मध्ये सर्व साधारण महिला , आणि प्रभाग १६ मध्येही सर्व साधारण महिला , असे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी उपरोक्त प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहिर केले यावेळी संग्रामपुर नगर पंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके , कार्यालय अधिक्षक शरद कोल्हे , व निर्वाचन विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते