११० अधिकारी कर्मचारी यांना विविध जबाबदाऱ्या
१३ केंद्रावर मतदान चमू रवाना
१३ वार्डातील 4066 मतदार हक्क बजावणार
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] उद्या होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूक साठी उपविभागीय अधिकारी देवकर व मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शानात सर्व विभागाच्या निवडणुकीसाठी नियुकत्या झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन सुचना तहसिल कार्यालयात देण्यात आल्या यानंतर १३केंदारावर प्रत्यकी 4 कर्मचारी याप्रमाणे मतदान केंद्र अधिकारी सह कर्मचारी 52 तसेच 13 पर्दानीस व 13 BLO आणि २६ पोलीस कर्मचारी , रवाना.यासाठी ३ झोनल अधिकारी व त्यांना सहाय्यक म्हणून 3 यांचा समावेश असलेले असे एकूण 110अधिकारी सह कर्मचारी मतदान केंन्द्र्रावर रवाना झाले ह्या निवडणूका कोणाच्याही दबावाखाली न येता मतदारांनी व अधिकारी ,कर्मचारी यांनी निर्भीडपणे शांततेत पार पाडाव्यात असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे यावेळी तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्याधिकारी प्रशांत शेळके , नगर पंचायत कार्यालय अधिक्षक शरद कोल्हे , व निर्वाचन विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते