HomeUncategorizedप्रा.सय्यद अमजद यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

प्रा.सय्यद अमजद यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी प्रा. सय्यद अमजद अब्दुल वाहेद यांनी नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. “मराठवाड्यातील बालरंगभूमी- एक अभ्यास” हा विषय घेऊन त्यांनी आपले संशोधन सौ. के. एस. के. महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे.बालरंगभूमीवर मराठवाड्याच्या आठ ही जिल्ह्यात होणाऱ्या चळवळींचा, शालेय रंगभूमीचा, बाल राज्यनाट्य स्पर्धेचा, हौशी बालनाट्य संस्थांचा, बाल रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे नाट्यशास्त्र माजी विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर ,प्रा. स्मिता साबळे, प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर प्रा. डॉ. संजय पाटील देवळाणकर, प्रा. दुष्यंत रामटेके, प्रा. अशोक बंडगर, प्रा. वैशाली बोधले, प्रा. गजानन दाडगे, प्रा. गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments