Homeबीड शहरसमाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा अल्पसंख्याकदिनी लोकसेनेकडून जाहिर निषेध.!

समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा अल्पसंख्याकदिनी लोकसेनेकडून जाहिर निषेध.!

बीड : १८ डिसेम्बर ला जागतिक अल्पसंख्याक हक़ दिवस साजरा केला जातो भारतात व महाराष्ट्रात ही दरवर्षी अल्पसंख्याक दिवस साजरा करण्याचे निर्देश सरकार प्रशासनाला देत असते परंतु हवालदील सरकार आणि उदासीन मानसिकतेचे प्रशासन जबाबदारीने अल्पसंख्याक दिवस साजरा करणार का? असा प्रश्न जनतेच्या वतीने लोकसेना प्रमुख प्रा.इलियास इनामदार यांनी केला आहे व लोकसेना संघटना जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त निवेदन देवून अल्पसंख्याक हक़ दिनी शासनाचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून वाकआउट करण्यात आले आहे. निषेध करण्याचे कारण शासनाने मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण दिले नाही, अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवला नाही, उर्दू बालवाड़यांना अंगणवाडीत रूपांतर केले नाही, राज्यात एमपीएससी/यूपीएससी अभ्यासकेंद्र स्थापन केले नाही, मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे बजट वाढ करुन सर्वे व्यावसायिक कर्ज योजना सुरु केली नाही, वक्फ जमीनीवरील बेकायदेशीरपणे केलेली अतिक्रमणे काढ़ण्यात आली नाही व वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजानिक करण्यात आला नाही, मुस्लिम युवकांना नौकरी व शिक्षणामध्ये संधी उपलब्ध करून दिली नाही,अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रक्कम मध्ये वाढ केली नाही व मेरिट ऐवजी कम्पल्सरी सर्व विद्यार्थीयांना देण्यात येत नाही, देशात व राज्यात अल्पसंख्याक समाजाला सर्वच क्षेत्रात दुय्यम वागणूक मिळत आहे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समिती स्थापन केली नाही, राज्यातील अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न मार्गी लावला नाही, या वरील करणाने लोकसेना संघटना व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने शासनाचा निषेध करत आहे यावेळी प्रा. इलियास इनामदार, ऐड. कलीम काज़ी, खैसर बेग, अतीख अहमद खान, नदीम मेंबर, अयाज़ अख्तर, समीर काज़ी व इतर अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments