बीड प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पद भरती परीक्षा देखील महाराष्ट्र शासनाने घ्याव्यात कारण की नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या परीक्षा असेल आरोग्य विभागाच्या परीक्षा असतील किंवा त्या संदर्भातच सैन्य भरतीची परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये अतिशय अनागोंदी कारभार प्रचंड भ्रष्टाचार पेपरफुटी आणि पैशाचे भरपूर व्यवहार झालेले आहेत ही अतिशय चुकीची आहे त्यामुळे इथून पुढील सर्व पदभरती ही महाराष्ट्र शासनाच्या द्वारे करण्यात यावी अशी मागणी आशिष अण्णा देशमुख यांनी केली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हाडा तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्यामध्ये पेपर फुटल्याने सामान्य विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे गोरगरीब विद्यार्थी शेतकरी कष्टकऱ्यांचे विद्यार्थी प्रचंड प्रमाणात शहरात राहून आणि प्रचंड क्लासेस वगैरे इत्यादींना पैसे खर्च करून मेहनतीने प्रचंड चिकाटीने अभ्यास करतात आणि अभ्यास करून ते यशस्वी होण्याचे स्वप्न पाहत असताना त्यांच्या भविष्याची सुंदर स्वप्न रंगवत असताना जर नोकरी भरती प्रक्रियेमध्ये इतका भ्रष्टाचार होत असेल तर तो त्यांचा होतकरू विद्यार्थ्यांची शासनाने केलेली ठरवून आत्महत्या ठरेल त्यामुळे कुठेतरी हा प्रकार बंद झाला पाहिजे पेपर फुटी वर परीक्षा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे हा पर्याय नसून सदर परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने व्हावी कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार सदर प्रक्रियेमध्ये होऊ नये आणि योग्य पद्धतीने योग्य निकष लावून योग्य उमेदवाराची निवड शासनाने या भरती द्वारे करावीत यासाठी महाराष्ट्र शासनाने एमपीएससी सारखी एक स्वतंत्र संस्था निर्माण करावी जी की सर्वस्वी शासनाच्या ताब्यात असेल शासकीय व्यक्ती तिथे नेमून महाराष्ट्र शासनाच्या द्वारे सर्व प्रक्रिया परीक्षेची पेपर घेणे तपासणे आणि निकाल लावून पदभरती करणे ही प्रक्रिया राबवावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नेते आणि उमेदवार आशिष अण्णा देशमुख यांनी केली आहे
महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र यंत्रणेमार्फत पद भरती करावी ; आशिष आण्णा देशमुख!
RELATED ARTICLES