संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा ते टुनकी रोडवरील सोनाजी नगर मधिल हनुमान मंदीराचे बाजुस रोडला लागुन असलेल्या 350 चौ फुट जागेत अनुसुचित जातीकरीता ग्रा प ने साफसफाई व खोदकाम केलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृहे बांधकामासाठी नियोजीत जागे वर गावातील एका इसमाने अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याने सोनाळा ग्रामविकास अधिकारी कोरे यांच्या तक्रारी वरुन संबंधीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध सोनाळा पोस्टेला दिलेल्या लेखी तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला सोनाळा ग्रा प हद्दीतील गट नं ६९१ मधील ३५० चौफुट जागेवर अनुसुचित जाती साठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृहे बांधण्यासाठी ग्रा प स्थरावर ठराव घेऊन सर्वानुमते मंजुर करुन वरिष्ट कार्यालयास कागद पत्राची पुर्तता केल्याने स्वच्छतागृहे बांधकाम साठी निधी मंजुर साठी पाठपुरावा करण्यात आल्याने स्वच्छतागृहे साठी निधी मंजुर झाल्याने ग्रा प करवी सदर जागेची साफ सफाई करुन या नियोजीत जागेवर स्वच्छतागृहे साठी खोदकाम करण्यात आले परंतु खोदलेले खडडे भुजविण्यात आल्याचे व सदर स्वच्छतागृहे बांधकाम नियोजीत जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे समजताच सरपंच ग्रामविकास अधिकारी इतर पदाधिकारी यांनी चौकशी करुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणारा गोपाल बघे हा घटना स्थळी आल्या नंतर त्यास जागे संबंधीत कागद पत्रे न दाखविण्याने ग्रामविकास अधिकारी व गावातील प्रतिष्टी नागरिक यांनी अतिक्रमणचे सांगितले परंतु अतिक्रमण धारक याने सांगितले कागद पत्राचे काहिच घेण देण नाही येऊन मी खडडे भुजविले जागा माझी आहे मी या ठिकाणी बांधकाम करणार व कोणासही या ठिकाणी बांधकाम करु देणार नाही व कोणी आला तर हात पाय तोडून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केली मी कोणत्याही साहेबाला घाबरत नाही तुमचे हात पाय तोडण्याची धमकी दिली तुमच्याने जे होईल ते करुन घ्या असा दम ग्रामविकास अधिकारी कोरे यांना दिला ग्रामविकास अधिकारी कोरे यांनी सोनाळा पोस्टेला दिलेल्या फिर्यादी वरुन गोपाल बगे याच्या विरुद्ध कलम ४४७, १८६ , ५०४, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सोनाळा पोलीस करित आहे
स्वच्छतागृहे नियोजीत जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न, एका विरुद्ध सोनाळा पोस्टेला गुन्हा दाखल !
RELATED ARTICLES