परळी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शरद यशवंत अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप परळी उपजिल्हा रुग्णालय येथे दि.17, 24, 31 डिसेंबर व 07 जानेवारी रोजी होणाऱ्या शिबिराचा दिव्यांग बांधवांना मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. परळी उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवार,दि.17,24,31 डिसेंबर 2021, व दि. 7 जानेवारी, 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शरद यशवंत अस्मिता अभियानाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शरद यशवंत अस्मिता अभियाना अंतर्गत परळी उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे होणार आहे. या शिबिराच्या अनुषंगाने उपरोक्त तारखांना,उपजिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी विभागामध्ये, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, व अस्थीरोगतज्ज्ञ, यांची कमिटी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करणार आहे. तसेच ज्या दिव्यांग बांधवांचे आगोदर बीड, अंबाजोगाई येथे आँनलाईन प्रमाणपत्र नोंदणी करण्यात आली आहे.अशा दिव्यांग बांधवांना नोंदणी करण्याची गरज नाही. तसेच परळी उपजिल्हा रुग्णालय येथे होणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शरद यशवंत अस्मिता अभियाना अंतर्गत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचा दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.
उपजिल्हा रुग्णालय येथे होणाऱ्या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा-डॉ.संतोष मुंडे
RELATED ARTICLES