Homeमहाराष्ट्रकमलाकर सोनकांबळे यांची राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच सेवारत्न पुरस्कारासाठी निवड

कमलाकर सोनकांबळे यांची राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच सेवारत्न पुरस्कारासाठी निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील मौजे गोगांव ता अक्कलकोट येथील युवा उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचे दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे देण्यात येणार राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार निवड झाल्याचे माहिती संस्थापक कृष्णाजी जगदाळे यांनी दिलेसिध्दार्थ सोशल फौंडेशन अध्यक्ष तथा गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी कोरोना काळात गावामध्ये कोव्हिडं रुग्णाला रुग्णालयात जाऊन त्यांना त्यांना मदत करणे , कोरोना काळात गावामध्ये वाढत असलेले कोरोना पाझिटिव्ह रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना मन परिवर्तन करून कुटुंबातील सर्वांचे टेस्ट करण्यास लावणे, वैद्यकीय अधिकारी यांचे भेट घेऊन रुग्णांना सहकार्य करणे व त्याना मानसिक धर्य देणे, गावामध्ये कोव्हिडं लसीकरण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, व लसीकरण शिबीर घेणे या सोबत गावच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, मागासवर्गीय युवकांना रोजगार निर्मिती व्हावे म्हणून युवा युवती साठी शिलाई मशीन वाटप, संगणक वाटप, झेरॉक्स मशीन वाटप, फळबाग लागवड योजने अंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्फत आंबे, चिंच, चिकू, या फळांचं लांब मिळवून दिले, बांधकाम कामगार योजने अंतर्गत 50 लोकांना लाभ मिळवून देण्यात आले, गोगांव गावामध्ये मोठया प्रमाणात कोव्हिडं टेस्ट करून गाव कोरोना मुक्त करण्यात महत्वाचे जबाबदारी बजावली असून गावामध्ये कोव्हिडं 19 लसीकरण पहिला डोस 100 टक्के करण्यात आले असून दुसरा डोस 65 टक्के झालेले आहेत या सर्व कामाचे दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच सेवारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे, या निवडीमुळे गावामध्ये आनंदउत्सव साजरा करण्यात आले, अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे , सरपंच सौ. वनिता सुरवसे,सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप, बसवराज सोनकांबळे, भाजप अनु जाती जमाती तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड, प्रा गौतम बाळशंकर, धोंडूराज बनसोडे, आदीने अभिनंदन करून शुभेच्छा दिले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments