Homeमहाराष्ट्रविद्युत सहाय्यकाचा निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्या प्रकरणातुन विज कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता

विद्युत सहाय्यकाचा निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्या प्रकरणातुन विज कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता

संग्रामपुर [ मकसूद अली ] येथील विद्युत वितरण केंद्रात कार्यरत असणारे विद्युत सहाय्यक राहुल प्रकाश पाटील याचा निष्काळजीपणे मृत्यु झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्या प्रकरणी तंत्रज्ञ मनोहर सुगदेव राजनकर , सोपान देविदास गावंडे तसेच वरवट बकाल येथील उपकेंद्रातील ऑपरेटर गजानन मोतीराम तायडे यांची भारतीय दंड संहितेच्या ३०४ ( अ ) नुसार दाखल प्रकरणातुन संग्रामपुर येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी दिनांक ०२/१२/२०२१ रोजी निर्दोष मुक्तता केली . महाराष्ट्र राज्य वित वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी दिनांक २० / ० ९ / २०१६ रोजी पोलीस स्टेशन तामगांव यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुध्द गुन्हा क्र . १ ९ ५ / १६ नुसार भादवी कलम ३०४ ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . सदर प्रकरणात पो.स्टे . तामगांव यांनी तपास करुन चार्जसीट संग्रामपुर न्यायालयात दाखल केली . सदर प्रकरणात फिर्याद अर्जात नमुद असल्याप्रमाणे दिनांक ० ९ / ०७ / २०१६ रोजी पांडव नदीच्या काठावर ११ के . व्ही . वाहीनीवर मयत राहुल प्रकाश पाटील हे तंत्रज्ञ आरोपी सोपान गावंडे यांच्यासोबत काम करण्यास गेले असता , त्याठिकाणी विद्युत प्रवाह सुरू होऊन मयत राहुल प्रकाश पाटील यांचा मृत्यु झाला . सदर काम सुरू असतांना तंत्रज्ञ आरोपी मनोहर राजनकर यांनी वरवट बकाल उपकेंद्रामधे जादुन ऑपरेटर आरोपी गजानन तायडे यांना ट्रॉयल टेस्टींगसाठी आयसोलेटर स्वीच बंद करुन विज पुरवठा सुरू करण्याबाबत सूचना केल्या , त्यावरुन विज पुरवठा सुरू होऊन मयत राहुल पाटील यांचा मृत्यु झाल्याबाबत नमुद करुन वरिल तीनही आरोपी विरुध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले . न्यायदंडाधिकारी संग्रामपुर न्यायालयात सरकार पक्षा तर्फे एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले . परंतु मयत राहुल पाटील यांचा मृत्यु आरोपींच्या निष्काळजीपणे झाल्याबाबतचा कोणताही पुरावा न्यायालयासमोर न आल्याने आरोपीवर दोषारोप निसंशय पणे सिध्द होऊ शकले नाही , यावरुन वि.न्यायदंडाधिकारी संग्रामपुर यांनी वरिल तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली . वरिल प्रकरणात आरोपी तर्फे अड . जि.ए. क्षीरसागर , अड . के . पी . बावस्कार व अड . एस . ए . गुप्ता यांनी काम पाहले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments